Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:06 IST

मुंबई : मुंबईत रविवारी १ हजार ६६ एकूण बाधित रुग्णांची नोंद झाली असून, १ हजार ३२७ रुग्ण बरे झाले ...

मुंबई : मुंबईत रविवारी १ हजार ६६ एकूण बाधित रुग्णांची नोंद झाली असून, १ हजार ३२७ रुग्ण बरे झाले आहेत. तर २२ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, २४ हजार ५४८ एकूण चाचण्या करण्यात आल्या आहेत.

मृत झालेल्या एकूण रुग्णांपैकी १८ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. १३ रुग्ण पुरुष आणि ९ रुग्ण महिला होत्या. १५ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. उर्वरित ७ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील होते. आता मुंबई जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९४ टक्के आहे. २३ ते २९ मेपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१६ टक्के आहे.

मुंबईतील दुपटीचा दर ४१४ दिवस आहे. तर सक्रिय कंटेनमेंट झोन ३८ आहेत. सक्रिय सीलबंद इमारती १६० आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.