Join us

ठाण्यात १५ उमेदवारांचे २२ अर्ज

By admin | Updated: September 26, 2014 23:57 IST

कुरेशींमुळे मेंडोन्सांना डोकेदुखी मीरा-भार्इंदर मतदारसंघ क्र. १४५ मधून काँग्रेसच्या याकुब कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

ठाणे : ठाण्यातील चार मतदारसंघांतून १५ उमेदवारांनी एकूण २२ अर्ज भरले आहेत. यामध्ये कोपरी-पाचपाखाडीमधून शिवसेनेचे आमदार शिंदे आणि भाजपाचे लेले यांनी प्रत्येकी चार तर ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार डावखरे यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केले असून अन्य उमेदवारांनी प्रत्येकी एकेक अर्ज भरला आहे.कुरेशींमुळे मेंडोन्सांना डोकेदुखी मीरा-भार्इंदर मतदारसंघ क्र. १४५ मधून काँग्रेसच्या याकुब कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. कुरेशी यांनी २००७ मधील पालिका सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे विद्यमान आ. गिल्बर्ट मेंडोन्सा यांना केवळ ७ मतांनी पराभूत करून आ. मेंडोन्सा यांच्या वर्चस्वाला अनपेक्षित धक्का दिला होता. तेव्हा एकूण विजयापैकी कुरेशी यांनी मिळवलेला विजय शहरात चर्चेचा विषय ठरला होता. २०१२ मध्ये दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. अंबरनाथमध्ये ५ अर्ज अंबरनाथमधून शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्यासह पाच उमेदवारांनी शुक्रवारी दुपारी अर्ज दाखल केले़ यात राष्ट्रवादीचे महेश तपासे, अपक्ष भरत घरे, सिद्राम कांबळे आणि यतीन मोरे यांचा समावेश आहे. उल्हासनगरात आमदारासह ७ अर्ज उल्हासनगर मतदारसंघातून आमदार कुमार आयलानी यांनी खाजगी सुरक्षारक्षकाच्या संरक्षणात भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला़ तसेच त्यांची पत्नी मीना यांनीही डमी अर्ज भरला आहे़ बीएसपीचे प्रवीण गायकवाड, सुरेश सोनावणे, इब्राहिम अब्दुल अन्सारी, अब्दुल गफार शेख, भगवान सिरोचे आदींनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले.मुरबाडमध्ये कथोरेंसह ८ अर्ज मुरबाड मतदारसंघातून विद्यमान आमदार किसन कथोरे यांनी भाजपातून, माजी आमदार गोटीराम पवार यांनी राष्ट्रवादीतून, शिवसेनेकडून वामन म्हात्रे, बसपातर्फे श्यामराव थोरात व ४ अपक्ष अशा आठ जणांनी शुक्रवारी अर्ज भरले आहेत. कल्याणात ८ अर्ज पश्चिममधून मनसे आमदार प्रकाश भोईर यांच्यासह ६ जणांनी अर्ज भरले. कल्याण ग्रामीणमधून मनसे आमदार रमेश पाटील आणि शिवसेनेतर्फे माजी आमदार सुभाष भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.शहापुरात एक अर्ज मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीतर्फे आदिवासी नेते गोपाळ रेरा यांनी अर्ज भरला.