Join us

देवीच्या 2024 मूर्तीचे विसजर्न

By admin | Updated: October 3, 2014 22:55 IST

शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधिवत सरस्वतीपूजा, शस्त्रपूजनाबरोबरच सोनेखरेदी आणि एकमेकांना देण्यात आलेल्या शुभेच्छांनी दस:याचा उत्साह पाहायला मिळाला.

ठाणो : शुक्रवारी सकाळपासूनच शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधिवत सरस्वतीपूजा, शस्त्रपूजनाबरोबरच सोनेखरेदी आणि एकमेकांना देण्यात आलेल्या शुभेच्छांनी दस:याचा उत्साह पाहायला मिळाला. सायंकाळनंतर पारंपरिक नृत्य, लेझीम, ढोलताशांच्या गजरात जिल्ह्यात 2क्24 मूर्तीचे आणि 1557 घटांचे विसजर्न करण्यात आले. जिल्हय़ात सहा ठिकाणी रावणदहनही झाले. गेले नऊ दिवस आदिशक्तीची मनोभावे पूजा केल्यानंतर शुक्रवारी शहरातील 1 हजार 328 तर ग्रामीण भागातील 696 मूर्तीचे विसजर्न करण्यात आले. शेवटच्या दिवशीही ठाण्याच्या गावदेवी, घंटाळी तसेच कल्याणच्या दुर्गाडीदेवीच्या मंदिरांत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सायंकाळी घरोघरी पूजाअर्चा करून एकमेकांना आपटय़ाच्या पानांचे वाटप करून दस:याच्या शुभेच्छा दिल्या. 
 
विजयादशमी हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असून या दिवशी सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच आज नागरिकांनी एकमेकांना आपटय़ाची पाने देऊन शुभेच्छा दिल्या. दुसरीकडे अनेक ज्वेलर्सच्या दुकानात सोने खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची चांगलीच गर्दी झाली होती. दिवसभरात अनेक ज्वेलर्सच्या दुकानांत कोटय़वधींची उलाढाल झाली.