Join us

एसबीआयची २ हजार पदे, १० लाख अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 04:13 IST

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या परीविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी आॅफिसर) पदाच्या २ हजार जागांसाठी तब्बल ९.७५ लाख अर्ज आले आहेत.

मुंबई : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या परीविक्षाधीन अधिकारी (प्रोबेशनरी आॅफिसर) पदाच्या २ हजार जागांसाठी तब्बल ९.७५ लाख अर्ज आले आहेत. याचाच अर्थ, एका जागेसाठी सुमारे ५00 अर्ज आले आहेत. बँकेकडून लिपिक पदाच्या ८,३00 जागाही भरण्यात येत असून, त्यासाठी १६.६ लाख अर्ज आले आहेत.एसबीआयचे उपव्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, परीविक्षाधीन अधिकारी पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त पदवी (ग्रॅज्युएशन) ही आहे. उमेदवाराला लेखी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागेल. त्यानंतर, त्याला मुलाखत आणि समूह चर्चा यांचा सामना करावा लागेल. लिपिक पदासाठी आलेल्या अर्जापैकी ७0 टक्के उमेदवार इंजिनीअर अथवा व्यवसाय व्यवस्थापन शास्त्रातले (बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत.

टॅग्स :नोकरी