Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत 20% पाणीकपात?

By admin | Updated: July 1, 2014 01:32 IST

पावसाच्या गैरहजेरीत तलावांची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आह़े

मुंबई : पावसाच्या गैरहजेरीत तलावांची पातळी दिवसेंदिवस कमी होत असल्याने मुंबईत 20 टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने ठेवला आह़े जुलै महिन्यातही पावसाचा नूर असाच राहिल्यास ही कपात आणखी वाढणार आह़े ही पाणीकपात बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत जाहीर होण्याची शक्यता आह़े
मान्सूनने या वर्षी दडी मारल्यामुळे तलाव क्षेत्रंमधील पाणीसाठय़ाची स्थिती चिंताजनक आह़े सध्या तलावांमध्ये केवळ 31 जुलैर्पयतचा पाणीसाठा शिल्लक आह़े त्यामुळे मुंबईवर भीषण पाणीसंकट घोंघावत असून] 2क् टक्के पाणीकपात लागू करण्याचा प्रस्ताव आयुक्त सीताराम कुंटे यांनी आज बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत ठेवण्यात आला़
हा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडण्यात येणार आह़े 2क्क्9मध्येही अपु:या पावसामुळे पाणीकपातीची वेळ आली होती़ त्या वेळेस पाणीकपातीबाबतचा अंतिम निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता़ मात्र या वेळेस पाणीकपातीची घोषणा स्थायी समितीमध्ये होईल, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
पाणीकपात 
आणखी वाढणार
जुलै महिन्यात पावसाने अशीच ओढ दिल्यास मुंबईला दुष्काळाचा सामना करावा लागणार आह़े अशावेळी तलावांमधील पाणी जास्त काळ पुरवता यावे यासाठी पाणीकपात 25 ते 3क् टक्क्यांर्पयत वाढवावी लागेल, असे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिका:याने सांगितल़े
 
तलावातील पाणीसाठा
तलावपाणीसाठा
मोडक सागर59648
तानसा14क्24
भातसा42732
तुळशी24क्9
विहारक्000
अप्पर वैतरणाक्000
मध्य वैतरणाक्000