Join us

बिबट्याच्या हल्ल्यातील मृत बालकाच्या कुटुंबाला २० लाखांची मदत; १० लाख FD करणार

By मनोहर कुंभेजकर | Updated: October 29, 2022 16:13 IST

इकिता लोट हीच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १० लाखांची मदत व उर्वरित १० लाख वडीलांच्या नाव फिक्स डिपॉझिटच्या रूपात देणार

मुंबई-दिपावलीच्या पहिल्याच दिवशी आरेतील युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षाच्या  इकिता लोट हीच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीचा दुर्देही मृत्यृ झाला होता. या घटनेनंतर जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी तात्काळ घटनास्थळाची पहाणी करुन इकिताच्या कुटुंबांची भेट घेऊन सांतवनही केले तसेच आर्थिक मदतही केली होती. तसेच इकिताच्या कुटुंबियांना शासनाच्या नियमानुसार मदत करण्याच्या सुचना दिल्या होत्या. 

राज्य शासनाच्या नियमानुसार इकिताच्या कुटुंबियांना एकुण २० लाख रूपयांची मदत करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्य शासनाकडून इकिताच्या वारसांना पहिल्या टप्प्यात रुपये १० लाखांचा चेक आमदार रविंद्र वायकर यांच्या हस्ते आज देण्यात आला. तसेच उर्वरीत १० लाख रूपये फिक्स डिपॉझिट्स रूपात वडीलांच्या नावे येत्या १५ दिवसांत देण्यात येणार आहे. 

यावेळी वन विभागाचे वनपरीक्षेत्र अधिकारी राकेश भोईर, वनपाल अधिकारी नारायण माने, रामा भांगरे, धुरी, वनरक्षक सुरेंद्र पाटील, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, शाखाप्रमुख बाळा तावडे, संदिप गाढवे, मयुरी रेवाळे, हर्षदा गावडे,  राहुल देशपांडे, पुजा शिंदे,  अजय प्रधान, वैभव कांबळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.