Join us
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण रेल्वे स्थानकात 2 वर्षीय मुलगी सापडली

By admin | Updated: September 7, 2014 01:48 IST

दोन वर्षाची मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात सापडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली

डोंबिवली : दोन वर्षाची मुलगी कल्याण रेल्वे स्थानकात सापडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. स्थानकातील पश्चिमेकडील भागात असलेल्या तिकिट आरक्षण केंद्रात ही मुलगी असल्याचे भाविक पांचाळ या युवकाला दिसले.
त्यावरुन त्याने आधी रेल्वे पोलिस दल (आरपीएफ)शी संपर्क साधला मात्र तेथे सहकार्य न मिळाल्यावर त्याने संध्याकाळी पावणोसातच्या सुमारास मुलीला घेऊन कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात आल्याची माहिती वरिष्ठ लोहमार्ग पोलिस सोमनाथ तांबे यांनी दिली.
मुलीची सर्व माहिती घेत पांचाळ याच्याकडून तीला येथिल रुक्मिणीबाई ईस्पितळात दाखल केले. तेथे वैद्यांशी चर्चा करुन तांबे यांनी तीस भिवंडीच्या बाल समाज कल्याणमध्ये पाठवले, मात्र तेथे मुलीच्या तब्येतीच्या कारणास्तव तीस पुन्हा कल्याणला आणले. त्या ठिकाणी पुरेशी सुविधा नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी तीला सायन इस्पितळात दाखल केले असून शनिवारी रात्री उशिरार्पयत तीची तब्येत योग्य असल्याच्या वृत्ताला तांबे यांनी दुजोरा दिला.
दरम्यान जीआरपी की आरपीएफ या सुरक्षा यंत्रणोतील फरकच या युवकाला न समजल्याचे तांबे 
म्हणाले. त्यामुळे प्रसिद्धी माध्यमांचा गोंधळ झाला, प्रत्यक्षात आरपीएफने त्यांना काय वागणूक दिली हे 
माहित नाही, परंतू पावणोसातला 
जेव्हा मुलीला ते जीआरपीकडे 
आले त्यानंतर मात्र तातडीने सर्व हालचाली करण्यात आल्या असून तीची प्रकृति योग्य असल्याचे स्पष्टीकरण तांबे यांनी दिले. (प्रतिनिधी)