Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात काेराेनाचे २ हजार ६२८ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात शुक्रवारी २ हजार ६२८ नवीन रुग्णांची, तर ४० मृत्यूंची नाेंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात शुक्रवारी २ हजार ६२८ नवीन रुग्णांची, तर ४० मृत्यूंची नाेंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या २० लाख ३८ हजार ६३० झाली. दिवसभरात ३ हजार ५१३ रुग्ण बरे झाले. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ५२ हजार १८७ रुग्ण काेराेनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७६ टक्के आहे. सध्या ३३ हजार ९३६ सक्रिय रुग्ण आहेत.

सध्या राज्यातील मृत्युदर २.५१ टक्के एवढा आहे. आतापर्यंत ५१ हजार २५५ लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ४८ लाख ७५ हजार ६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ३८ हजार ६३० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ७७ हजार ५६० व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २ हजार २५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

........................