Join us  

३०० जणांनी एकत्र येऊन केली वर्सोवा चौपाटीची स्वच्छता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 12:41 AM

नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ही एक सामाजिक बांधिलकी हे जाणून जीवनविद्या मिशनच्या वतीने वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.

मुंबई : पर्यावरण हाच नारायण व पर्यावरण हिच परमेश्वराची उपासना या सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या सद्गुरु बोधास अनुसरुन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन ही एक सामाजिक बांधिलकी हे जाणून जीवनविद्या मिशनच्या वतीने वर्सोवा, देवाची वाडीच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.जीवनविद्या मिशनच्या मुंबईतील विविध शाखांच्या सुमारे ३०० तरुणांनी, पुरुष व महिला नामधारकांनी आणि नागरीकांनी यात भाग घेतला. जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, सचिव विवेक बावकर, गिरीश कलव, किशोर शिंदे, संतोष सावंत, प्रमोद रासम, तुषारजी राणे आणि सर्व आजी व अनुभवी विश्वस्त या प्रसंगी उपस्थित होते. मिशनचे तरुण कार्यकर्ते जयेश बने, आशिष चव्हाण, तेजस साळवी, करण शेवाळे इत्यादींनी या स्वच्छता अभियानासाठी प्रयत्न केले. महानगर पालिकेच्या के/पश्चिम विभागाच्या घनकचरा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छता अभियानावेळी किनाºयावरील जमा झालेला कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या जेसीबी, ट्रक ही यंत्र सामुग्री व कामगारांना कार्यरत ठेवून सहकार्य केले. यासाठी महापालिकेचे विशेष कार्यकारी अधिकारी सुभाष दळवी, सहा.अभियंता बांगर व दुय्यम अभियांता शिरसाट यांनी मोलाचे सहकार्य दिले. प्रभाग क्रमांक ५९ चे शाखाप्रमुख सतीश परब, स्नेहा परब, दर्शना रासमसह शिवसैनिकांनी स्वच्छताग्रहींना नाश्ता दिला.