मुंबई : मुंबईत बुधवारी ३९७ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत २ लाख ९२ हजार २२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे शहर उपनगरात बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५६३ दिवसांवर पोहोचला आहे. सध्या ५ हजार ६२५ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहर उपनगरात २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.१२ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत २८ लाख ४७ हजार ३६८ चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५०३ रुग्ण आणि ७ मृत्यूंची नोंद झाली आहे. परिणामी, शहर उपनगरात कोरोना बाधितांची एकूण संख्या ३ लाख १० हजार १३४ झाली असून, मृतांचा आकडा ११ हजार ३७३ झाला आहे.