कल्याण: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीचे 8 सदस्य नोव्हेंबर महिनाअखेर निवृत्त होत आहेत.येत्या 19 नोव्हेंबरला बुधवारी विशेष महासभा होणार असून यात नव्या सदस्यांची घोषणा होणार आहे. रिक्त होणा-या जागांवर कोणाची वर्णी लागते? याकडे आता लक्ष लागले आहे.
स्थायी समितीत एकुण 16 सदस्य आहेत.पक्षीय बलाबल पाहता शिवसेना 4,भाजपा 1,मनसे 4,काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 2 तर अपक्ष 3 सदस्य आहेत.या तीन अपक्षांपैकी दोघांचा शिवसेनेला तर एका सदस्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा आहे.दरम्यान 16 सदस्यांपैकी 8 सदस्य हे निवृत्त होत आहेत. यात प्रमोद पिंगळे,शोभा पावशे,दुर्योधन पाटील,प्रकाश पेणकर,संजय पावशे,मनोज घरत,हर्षद पाटील,उषा वाळंज आदि सदस्यांचा समावेश आहे.केडीएमसीची सार्वत्रिक निवडणुक ऑक्टोबर 2क्15 मध्ये होणार असल्याने स्थायीत नव्याने नियुक्त केल्या जाणा-या 8 सदस्यांसाठी केवळ 7 ते 8 महिन्याचा कालावधी मिळणार आहे.त्यामुळे अखेरच्या टप्प्यात स्थायीवर वर्णी लावण्यात कोण यशस्वी ठरतो? याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान मनसेचे मनोज घरत आणि हर्षद पाटील यांची काही महिन्यापुर्वीच स्थायीवर नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे या दोघांना मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.स्थायीच्या नव्या सदस्यांच्या नियुक्तीसाठी 19 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता विशेष
सभा बोलाविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)