Join us

‘नो पार्किंग’च्या १९ हजार ७९१ केसेस

By admin | Updated: June 15, 2016 04:17 IST

मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्न सतावत आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक जण नो पार्किंगमध्ये वाहने उभे करतात. अशा वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्न सतावत आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक जण नो पार्किंगमध्ये वाहने उभे करतात. अशा वाहनांवर वाहतुक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. जानेवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत १९ हजार ७९१ केसेस नो पार्किंगच्या दाखल केल्या आहेत. त्यांच्यावर केलेल्या कारवाईतून १ कोटी ६३ लाख ६६ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. सातत्याने कारवाई करूनही नो पार्कींगमध्ये वाहने उभी केली जात असल्याने ही कारवाई केली जाते. (प्रतिनिधी)