मुंबई : महापालिका निवडणुकीच्या काळात विकास प्रकल्पांचा बार झटपट उडवण्यासाठी तब्बल १९०० वृक्षांची कत्तल होणार आहे. या कत्तलीस वृक्ष प्राधिकरण समितीने मंजुरी दिली आहे. यामध्ये मेट्रो प्रकल्पात बाधा ठरणाऱ्या ६०० वृक्षांचा समावेश आहे.महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी विकासकामे मंजूर करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांची लगबग सुरू आहे. मात्र काही ठिकाणी वृक्षांचा अडथळा निर्माण झाल्याने प्रकल्प रखडले. यात भाजपाच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचा समावेश आहे. पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी आतापर्यंत या प्रस्तावांना शिवसेनेकडून विरोध केला जात होता. मात्र आचारसंहितेपूर्वीच्या बैठकीत वृक्ष कत्तलीच्या ८० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये ३२०० वृक्ष छाटण्याचे प्रस्ताव होते. यापैकी १८८७ वृक्ष तोडण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)
विकास प्रकल्पांसाठी १९०० वृक्षांची कत्तल
By admin | Updated: January 6, 2017 03:08 IST