नवी दिल्ली : गेल्या अडीच वर्षांत मुंबईच्या हवाई क्षेत्रात विविध विमान कंपन्यांच्या विमानांसोबत ‘निअर मिस’च्या १९ घटना घडल्या आहेत, अशी माहिती नागरी उड्डयन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.मुंबईच्या हवाई क्षेत्रात २०१३ मध्ये अशी दोन विमाने एकमेकांपासून अगदी जवळून उड्डाण करीत असल्याच्या (निअर मिस) नऊ घटना घडल्या, तर २०१४ मध्ये चारच वेळा असे प्रकार घडले. यावर्षी जूनपर्यंत अशा सहा घटनांची नोंद करण्यात आली आहे. एअरप्रॉक्स तपास पथकाकडून या सर्व घटनांची चौकशी करण्यात आली असून चौकशी अहवालातील शिफारशींची अंमलबजावणीही केली जात आहे, असे शर्मा यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले. मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष दररोज किमान ७८० विमानांच्या उड्डाण आणि उतरण्याचे नियंत्रण करतो. (वृत्तसंस्था)
मुंबईत ‘निअर मिस’च्या १९ घटना
By admin | Updated: July 31, 2015 01:37 IST