मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालांचा गोंधळ अजूनही संपलेला नाही. आॅक्टोबर महिना आला, तरीही तपासणी आणि निकालाचे काम विद्यापीठाकडून पूर्ण झालेले नाही. रविवारी सायंकाळी विद्यापीठाने १८ हजार ८३३ पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर केले असून, अजूनही तब्बल ४८ हजार ३६५ निकाल शिल्लक असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.प्रथम सत्राच्या परीक्षेसाठी विद्यापीठाकडे आलेल्या पुनर्मूल्यांकनांच्या अर्जामध्ये कला १ हजार ९६८, वाणिज्य ४ हजार ४४३, विधि ८ हजार ७२१, विज्ञान ६ हजार ७९ , व्यवस्थापन १ हजार ९२२ आणि तंत्रज्ञान २५ हजार २३२ अर्ज आले आहेत. पुनर्मूल्यांकनाच्या निकालांमध्ये कला शाखेचे ५१३, वाणिज्य ५५३, विधि १ हजार २१७, विज्ञान ७१८, व्यवस्थापन १९२ आणि तंत्रज्ञान १५ हजार ६४१ निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. उर्वरित पुनर्मूल्यांकनाचे निकाल हे जाहीर करण्यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात असल्याचे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.मुंबई विद्यापीठाने २०१७ च्या पहिल्या सत्राच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने केली. या पद्धतीमुळे निकाल लावण्यास उशीर झाला. त्यामुळे पुनर्मूल्यांकनाचा आकडा वाढला आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या ४८ हजार ३६५ अर्जांपैकी १८ हजार ८३३ अर्जांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल विद्यापीठाच्या ँ३३स्र://६६६. े४े१ी२४’३२.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
१८ हजार पुनर्मूल्यांकनाचे निकाल जाहीर ''
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 05:03 IST