Join us  

राज्यात कोरोनाचे नवे १७२ रुग्ण; मुंबईत ३२ नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:46 AM

‘जेएन-१’ या कोरोना उपप्रकाराची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. 

मुंबई : राज्यात शनिवारी कोरोनाचे नवे १७२ रुग्ण आढळून आले. त्यात ३२ मुंबईतील आहेत. राज्यात आतापर्यंत ६१३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या १४८ आहे. शनिवारी ३८ कोरोनाबाधितांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ‘जेएन-१’ या कोरोना उपप्रकाराची लागण झालेला एकही रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही. 

मुंबईत आढळलेल्या ३२ रुग्णांपैकी तीन जणांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ पैकी १४ बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ५७० चाचण्या करण्यात आल्या. शनिवारी राज्यात जे एन-१ चे  १९ नवे रुग्ण सापडले. सध्या राज्यात एकूण जे एन-१ चे  २९ रुग्ण झाले. पुणे जिल्ह्यामध्ये १२, बीड जिल्ह्यात ३, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २  रुग्ण सापडले. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस