Join us

आरेत १७ वर्षीय मुलीवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गोरेगावच्या आरे परिसरात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी हा मुलीचा आत्येभाऊ असल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोरेगावच्या आरे परिसरात १७ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला. आरोपी हा मुलीचा आत्येभाऊ असल्याची माहिती असून, आरे पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

पीडित मुलगी ही वांद्रे परिसरात राहत असून आरोपी आरे परिसरात राहतो. त्याला कामावरून सुट्टी मिळाली की ताे मुलीच्या घरी राहायला येत असे. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिला आरे कॉलनी येथील घरात भेटायला बोलावले हाेते. ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले आणि मुलीला दिवस गेले. याबाबत घरच्यांना समजले आणि त्यांनी १३ फेब्रुवारी, २०२१ रोजी वांद्रे पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. जी नंतर झिरोझिरोवर आरे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. आरोपी हा सैन्यात कार्यरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.