Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुहू समुद्र किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलीला बुडताना वाचवले

By मनोहर कुंभेजकर | Updated: July 18, 2024 19:30 IST

पावसात सुमुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी येथील समुद्रात उतरू नये असे आवाहन येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी केले आहे.

मुंबई - जुहू समुद्रकिनारी सिटीझन हॉटेल समोर बुडणाऱ्या १७ वर्षीय मुलीची येथील जीवरक्षकांनी सुटका केली. मालाड पश्चिम मालवणी येथील आमना सादिक सोपरकर ही सायंकाळी पाचच्या सुमारास येथील पाण्यात बुडत असल्याचे पालिकेचे जीवरक्षक मनोहर शेट्टी व दृष्टी लाईफ सेविंग कंपनीचे जीवरक्षक नितेश बाईत व यश मेस्त्री यांच्या लक्षात आले. त्यांनी पाण्यात सूर मारत या मुलीला बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

पावसात सुमुद्र खवळलेला असल्याने पर्यटकांनी येथील समुद्रात उतरू नये असे आवाहन येथील जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी केले आहे. 

टॅग्स :पाण्यात बुडणे