Join us

मुलुंडमध्ये १६ गाड्यांची तोडफोड

By admin | Updated: January 20, 2015 01:16 IST

सहा जणांच्या टोळीने तब्बल १६ गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : सहा जणांच्या टोळीने तब्बल १६ गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. आशिष जाधव (१९), अरु ण मोरे (२४), अविनाश चौगुले (२४) आणि रूपेश पटेल (२२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून, आज त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. मुलुंड पश्चिमेकडील गोशाळा रोड येथे मध्यरात्री ३च्या सुमारास याच परिसरातील सहा जणांच्या टोळीने परिसरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. बेभान झालेल्या या तरुण मंडळींनी रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्या फोडण्यास सुरुवात केली. यामध्ये तब्बल १६ गाड्यांची तोडफोड करीत तरुणांनी पळ काढला. यात दुचाकीपासून रिक्षा, कार, टेम्पो आणि ट्रकचाही समावेश आहे. पहाटेच्या दरम्यान गाडी धुण्यासाठी आलेल्या वाहनमालकांना वाहनांच्या काचा तुटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वाहनमालकांनी तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा दाखल करीत मुलुंड पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरु वात केली. (प्रतिनिधी)