Join us  

१६ हजार लीटर अनधिकृत मद्याचा साठा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 12:45 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी कार्यवाही करण्यात येत असून, राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे मुंबईच्या उपनगर जिल्ह्यात ११ मार्च ते १५ एप्रिल या कालावधीत १४२ प्रकरणी सुमारे १८ लाखांहून अधिक किमतीचा अनधिकृत मद्याचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी १२८ व्यक्तींना अटक करण्यात आली. अवैध मद्यासाठी वाहतूक प्रकरणी २ लाख ५५ हजार किमतीची पाच वाहने जप्त करण्यात आली आहेत.राज्य उत्पादन शुल्क खात्याद्वारे अनधिकृत वा अवैध मद्य साठ्यावर ११ मार्चपासून उपनगर जिल्ह्यात कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार, ११ ते ३१ मार्च कालावधीदरम्यान ९३ प्रकरणी सुमारे ९ लाख ४९ हजार ७७५ रुपये किमतीचा ९ हजार ९२४ लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. ८४ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर १ लाख ९५ हजार रुपये किमतीची ३ वाहने जप्त करण्यात आली. १ ते १५ एप्रिल कालावधीदरम्यान ४९ प्रकरणी ८ लाख ५३ हजार ७६९ रुपये किमतीचा ६ हजार १४० लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला.>महिनाभराची आकडेवारी११ मार्च ते १५ एप्रिल कालावधीदरम्यान १४२ प्रकरणी १८ लाख ३ हजार ५४४ रुपये किमतीचा १६ हजार ६४ लीटर अनधिकृत मद्यसाठा जप्त करण्यात आला. यामध्ये ६१७ लीटर हातभट्टीची दारू, १३ हजार २०० लीटर इतक्या प्रमाणातील मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे ‘वॉश’ रसायन, ५२४.२८ लीटर देशी मद्य, २१८.६३ लीटर विदेशी मद्य, २५१.८७ लीटर बीअर, ताडी १,१९४ लीटर व इतर प्रकारचे ६०.२ लीटर मद्य पदार्थांचा समावेश आहे.२ लाख ५५ हजार किमतीची५ वाहने जप्त करण्यात आली.