Join us

रस्त्यांवर थुंकणाऱ्या लोकांकडून १६ लाख ७४ हजार दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:09 IST

पालिका आक्रमक : १६ लाख ७४ हजारांचा दंड वसूलमुंबईतील सहा महिन्यांतील कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा ...

पालिका आक्रमक : १६ लाख ७४ हजारांचा दंड वसूल

मुंबईतील सहा महिन्यांतील कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांकडून २०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. तसेच मास्क न लावण्याबरोबच सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासही मनाई करण्यात आली आहे. सप्टेंबर २०२० ते २ फेब्रुवारी २०२१ या सहा महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावर थुंकणाऱ्या तब्बल आठ हजार ५२३ लोकांकडून १६ लाख ७४ हजार रुपये दंड मुंबई महापालिकेकडून वसूल करण्यात आला आहे.

सार्वजनिक परिसर अस्वच्छ करणे, रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर पालिकेच्या क्लीन अप मार्शल्समार्फत कारवाई केली जाते. गेल्या वर्षी मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यानंतर तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार हा नियम मोडणाऱ्या लोकांवर एप्रिल महिन्यापासून कारवाई सुरू करण्यात आली. त्याचबरोबर खोकणे व रस्त्यावर थुंकणे यांनीदेखील कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका असल्याने महापालिकेने अशा लोकांविरोधात कारवाई तीव्र केली.

* मास्क न लावणाऱ्यांवरही कारवाई

सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणाऱ्या १२ लाख ९४ हजार ३१२ लोकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तब्बल २६ कोटी २४ लाख ९२ हजार रुपये दंड महापालिकेने वसूल केला आहे. कुर्ला, गोवंडी, चेंबूर येथील एक हजार ६२० लोकांकडून तीन लाख नऊ हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत, तर मुलुंड, भांडुप व घाटकोपर येथून सर्वांत कमी ९१६ लोकांकडून एक लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

...............