४वणी : सोमवारी परिसरात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे शेतपिकांची मोठी हानी झाली असून, काजीमाळेगाव येथे द्राक्षबागांचे गारांच्या पावसामुळे नुकसान झाले, तर फोफशी येथे वादळामुळे अनेकांची टमाटा शेती उद््ध्वस्त झाली आहे. दुपारच्या सुमारास परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. काजीमाळेगाव येथे गारांचा पाऊस झाल्याने अनेक द्राक्षबागांना याचा फटका बसला भिका मुरलीधर काळोगे यांचे सुमारे ७० टक्के द्राक्षबागांचे नुकसान झाले, तर उर्वरित पंचनामे उशिरापर्यंत सुरू होते. फोफशी परिसरात शांताराम महादू गायकवाड, लताबाई निवृत्ती तुंगार, विजय महादू गायकवाड, भास्कर महादू हाडक यांचे टमाटा वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाले. वादळीवारा व मुसळधार पर्जन्यवृष्टीचा फटका दहिदी, माळेगाव, कोशिंबे, बंधारपाडा, कोकणगाव परिसरात बसला असून, महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे व नुकसानीची आकडेवारी संकलित करण्याचे काम सुरू आहे.
१५,५०० पोलिसांचे ईडीसी मतदान
By admin | Updated: October 8, 2014 00:04 IST