Join us  

बांधकाम कामगारांच्या खात्यात १५ हजार जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 2:34 PM

लॉकडाऊनपूर्वी बांधकाम कामगारांना काम मिळत नव्हते. लॉकडाऊन नंतर त्यांची उपासमार होत असून या कामगारांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा करावे.

सिटूची कामगार मंत्र्यांकडे मागणी

मुंबई : लॉकडाऊनपूर्वी बांधकाम कामगारांना काम मिळत नव्हते. लॉकडाऊन नंतर त्यांची उपासमार होत असून या कामगारांच्या खात्यात पंधरा हजार रुपये जमा करावे, अशी मागणी सिटूने कामगार मंत्र्यांकडे केली आहे.

याबाबत सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड म्हणाले की,  राज्यात बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केले आहे. या मंडळामध्ये सेसच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये जमा आहेत. २३ मार्च पासून लाॅकडाऊन झाल्यानंतर आणि त्यापूर्वीही अनेक महिन्यापासून बांधकाम कामगारांना काम मिळत नाही व त्यांची उपासमार चालू आहे. लाॅकडाऊन झाल्यानंतर तर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या माध्यमातून बांधकाम मजुरांना आर्थिक साह्य मिळावे. 

केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्य सरकारांनी बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे बांधकाम मजुरांना आर्थिक सहाय्य दिले आहे  या संकट काळात मदत केली आहे . कामगार मंत्र्यांना विनंती आहे की तातडीने बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याबद्दल निर्णय करावा. बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडील निधी पडून असून  प्रत्येक नोंदीत कामगारांच्या खात्यामध्ये कमीत कमी पंधरा हजार रुपये ताबडतोब जमा करावेत अशी आपणास विनंती आहे. तसेच ज्या कामगारांनी नोंदणी साठी अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांची नोंदणी झालेली नाही तसेच  जे कामगार नोंदीत नाहीत अशा कामगारांना ही आर्थिक मदत के जाहीर करावी अशी मागणी कराड यांनी कामगार मंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसकोरोना वायरस बातम्या