Join us
Daily Top 2Weekly Top 5

साकीनाका येथील आगीत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 04:18 IST

पाच जखमीमुंबई : अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील आनंद भुवन या चाळीत मंगळवारी रात्री ९.३० वाजता सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या ...

पाच जखमी

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील साकीनाका येथील आनंद भुवन या चाळीत मंगळवारी रात्री ९.३० वाजता सिलिंडर स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५ जण जखमी झाले असून एका १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

अल्मास असे मृत मुलीचे नाव आहे. तर अनिसा, अस्मा, रिहान, सानिया आणि शिफिया अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री १० वाजताच्या सुमारास आग नियंत्रणात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाने दिली.