Join us  

दहा महिन्यांत २,३४८ रस्ते अपघात; ३२२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:50 AM

मुंबई : मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दहा महिन्यांत २,३४८ रस्ते अपघात झाले. या अपघातांत ३२२ जणांचा मृत्यू ...

मुंबई : मुंबईत जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दहा महिन्यांत २,३४८ रस्ते अपघात झाले. या अपघातांत ३२२ जणांचा मृत्यू झाला तर २,५२८ जण जखमी झाले. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान २,६१९ अपघात झाले होते़ त्यामध्ये ३९३ जणांचा मृत्यू झाला होता. जानेवारी ते ऑक्टोबर २०१८ आणि २०१९ मध्ये एकूण ७१५ जणांचा मृत्यू झाला आहे.राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी राज्य सरकार दरवर्षी रस्ते सुरक्षा मोहीम राबविते. यात वाहतूक पोलीस, परिवहन विभागाबरोबरच विविध सामाजिक संस्थाही सहभागी होतात. या मोहिमेनंतरही अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. दारू पिऊन वाहन चालविणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, ओव्हरटेक करणे इत्यादी कारणांमुळे राज्यात रस्ते अपघात होतच आहेत.शहरी भागांमध्ये अपघातांचे प्रमाण हे ४० टक्के तर ग्रामीण भागात हेच प्रमाण ६० टक्के आहे. यामध्ये ग्रामीण भागांत अपघाती मृत्यूचे प्रमाण ७१ टक्के आणि शहरी भागांत ते २९ टक्के आहे. दरम्यान, मुंबईत होणाऱ्या अपघातांमध्ये पादचाऱ्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :अपघात