Join us

जूनपर्यंत पार्किंगसाठी १५ नव्या जागा

By admin | Updated: May 1, 2017 04:28 IST

शहरात ९ हजार वाहने पार्क करता येतील, इतकी क्षमता असलेल्या १५ नव्या मल्टी-स्टोअर पार्किंगच्या जागा शहरात

मुंबई : शहरात ९ हजार वाहने पार्क करता येतील, इतकी क्षमता असलेल्या १५ नव्या मल्टी-स्टोअर पार्किंगच्या जागा शहरात उपलब्ध करण्यात येणार आहेत. पार्किंगसाठी ९० जागांच्या निविदा काढण्यात येणार असून, त्यापैकी १५ पार्किंगच्या जागा जूनपर्यंत वापरण्यास खुल्या करण्यात येतील, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.पार्किंग जागांच्या निविदा पुढील आठवड्यापर्यंत काढल्या जातील. काही दिवसांपूर्वी कुलाबा, कफ परेड आणि फोर्ट येथील आॅनस्ट्रिट व आॅफ-स्ट्रीट पार्किंगसाठी शुल्क वाढवले होते. पालिका या नव्या पार्किंग व्यवस्थेनंतर पार्किंगचे वाढीव दर सादर करणार आहे. मुलुंड, शिवडी, बोरीवली, ओशिवरा लिंक रोडवर आणि कलिना या ठिकाणी बहुमजली पार्किंग प्रस्तावित आहे. (प्रतिनिधी)