Join us  

मध्य रेल्वेवर आणखी १५ डब्यांची लोकल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2019 3:41 AM

मध्य रेल्वे मार्गावर येत्या सोमवारपासून १५ डब्यांची आणखी एक लोकल दाखल होत आहे.

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर येत्या सोमवारपासून १५ डब्यांची आणखी एक लोकल दाखल होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते डोंबिवली या मार्गावर ही लोकल धावेल. मध्य रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या दुसरा रेक आल्याने ही सेवा सुरू होत आहे.डोंबिवलीहून सकाळी ६ वाजून १४ मिनिटांनी सीएसएमटीला जाणारी १५ डब्यांची पहिली लोकल धावेल, तर सीएसएमटीहून सकाळी ११ वाजून ३७ मिनिटांनी डोंबिवलीला जाणारी १५ डब्यांची पहिली लोकल असेल. या लोकलला ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या दोन्ही लोकल सेवा वीकेन्डच्या दिवशी उपलब्ध असतील. सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांच्या सोमवार ते शुक्रवार २२ फेऱ्या, शनिवारी १६ फेऱ्या होतील. रविवारी एकही फेरी नसेल.डोंबिवलीहून प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. या गर्दीचा भार कल्याण, कसारा आणि कर्जत या लोकलवर पडत होता. त्यामुळे गर्दीचे विभाजन करण्यासाठी ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मध्य रेल्वेवर १५ डबा लोकल फेऱ्यांचा विस्तार करण्यात आला आहे.

टॅग्स :लोकल