Join us  

उद्यानांसाठी खर्च करणार १५ कोटी ६० लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 12:58 AM

मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकारच्या पुलांखाली २२ अभिनव उद्याने साकारणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिका मुंबई शहर आणि उपनगरात विविध प्रकारच्या पुलांखाली २२ अभिनव उद्याने साकारणार आहे. यामध्ये १५ उद्याने ही क्षितिज समांतर (आडवी) असणार आहेत. ७ उद्याने ही पुलांच्या खांबांवर फुलणारी उभी उद्याने असणार आहेत. २२ उद्याने विकसित करण्यासाठी सुमारे १५ कोटी ६० लाख रुपये खर्च येणार आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आणि स्थायी समितीच्या मंजुरीनंतर याबाबतचे कार्यादेश देण्यात येतील. कार्यादेश दिल्यापासून ३ ते ४ महिन्यांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी यासंदर्भात सांगितले की, पश्चिम उपनगरांतील विविध स्कायवॉक व उड्डाणपुलांखाली ७ अभिनव उद्याने साकारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये ४ उभ्या उद्यानांचा समावेश आहे. अभिनव उद्यानांच्या उभारणीसाठी रुपये ३ कोटी ३१ लाख खर्च अंदाजित आहे. शहर भागातील पुलांखाली ६ उद्याने प्रस्तावित असून यामध्ये ३ उभ्या उद्यानांचा समावेश आहे. या अभिनव उद्यानांसाठी रुपये ४ कोटी ९६ लाख खर्च अंदाजित आहे. पूर्व उपनगरांमध्ये ९ अभिनव उद्याने साकारली जाणार असून त्यासाठी ७ कोटी ३३ लाख रुपये खर्च अंदाजित आहे.पश्चिम उपनगरात ७ अभिनव उद्यानेपश्चिम उपनगरांमध्ये विविध ठिकाणच्या स्कायवॉक व उड्डाणपुलांखालील सुमारे १ लाख ४ हजार चौरस फुटांच्या जागेत ७ अभिनव उद्याने उभारण्याचे प्रस्तावित आहे.७ उद्यानांपैकी ४ उद्याने उभी उद्याने असणार आहेत. ज्यामध्ये स्कायवॉकच्या खांबांवर आकारास येणाऱ्या २ उभ्या उद्यानांचाही समावेश आहे.उद्यानांमध्ये कमी वीज खर्चात प्रकाश देणाºया एलईडीसारख्या दिव्यांचा वापर करून रोषणाई केली जाणार आहे.काही उद्यानांमध्ये विविधरंगी झाडे, हिरवळ, बसण्यासाठी बाक, जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांसाठी खेळणी, कुंपण असणार आहेत.मुंबई शहर भागात याच प्रकारची ६ अभिनव उद्याने, पश्चिम उपनगरांमध्ये ९ उद्याने फुलविण्यात येणार आहेत.त्यानुसार विविध प्रकारच्या पुलांखालच्या ३ लाख १४ हजार ३२६ चौरस फुटांच्या जागेत २२ उद्याने विकसित होणार असून यापैकी ७ उद्याने ही उभी उद्याने असणार आहेत.गोरेगाव पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाखाली व पश्चिम द्रुतगती मार्गाच्या जंक्शनजवळ सुमारे २५ हजार ४६७ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत अभिनव उद्यान आकारास येणार आहे.अंधेरी पश्चिम परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावर गोखले उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाखाली असणाºया ९ हजार ६८७ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत उद्यानासह सौंदर्यीकरण केले जाणार आहे.गोरेगाव परिसरात पश्चिम द्रुतगती महामार्गावर मृणालताई गोरे उड्डाणपूल आहे. उड्डाणपुलाच्या खालील पाच खांबांवर एक उभे उद्यान साकारले जाणार आहे. या उद्यानाच्या सभोवती एलईडी विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई केली जाणार आहे.जोगेश्वरी पश्चिम परिसरात स्वामी विवेकानंद मार्गावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाखाली असणाºया सुमारे ४ हजार ३०५ चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत उद्यानासह हिरवळ, विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई इत्यादी बाबी प्रस्तावित आहेत. उद्यानामध्ये असणाºया उड्डाणपुलाच्या खांबावर उभे उद्यान साकारण्यात येणार आहे.दहिसर स्टेशनच्या पूर्वेकडे स्कायवॉक आहे. या पुलाच्या खाली असणाºया खांबांवर साधारणपणे २१ हजार ५२७ चौरस फूट आकाराचे उभे उद्यान विकसित करण्यात येणार आहे.दहिसर स्टेशनच्या पश्चिमेकडेदेखील स्कायवॉक आहे. पूर्वेकडील स्कायवॉकप्रमाणेच या पुलाच्या खाली असणाºया खांबांवर उभे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. उद्यानाचा आकार साधारणपणे २१ हजार ५२७ चौरस फूट इतका असणार आहे.दहिसर परिसरात आनंदनगर उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाच्या खाली असणाºया खांबांवर साधारणपणे २१ हजार ५२७ चौरस फुटांमध्ये उभे उद्यान विकसित करण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका