Join us

 राज्यात कोरोनाचे १४४, मुंबईत २९ नवे रुग्ण

By संतोष आंधळे | Updated: January 11, 2024 19:15 IST

राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे.

मुंबई: राज्यात काही दिवसांपासून नवीन रुग्ण सापडण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये गुरुवारी  राज्यात एकूण १४४ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील २९ रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. त्यामुळे राज्यात ८२४  आणि मुंबईत १६३ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.  तसेच आज १६९ जण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

मुंबईत जे २९  रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी १ रुग्णाला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहरात सध्याच्या घडीला कोरोनाकरिता राखीव असणाऱ्या ४२१५ बेड्सपैकी २० बेड्सवर रुग्ण दाखल आहेत. दिवसभरात ७६८  चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नव्याने नोंद झालेले महामुंबईतील रुग्णमुंबई मनपा - २९ठाणे -१ठाणे मनपा - ९नवी मुंबई मनपा -२०कल्याण डोंबिवली - ४उल्हासनगर मनपा - १रायगड -१पालघर -१पनवेल मनपा - २

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्या