लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईत शुक्रवारी १४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यातील ११ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. ८ रुग्ण पुरुष तर ६ रुग्ण महिला होत्या. एकाचे वय ४० वर्षांखाली होते. १२ जणांचे वय ६० वर तर एकाचे वय ४० ते ६० वर्षांदरम्यान होते.
मुंबईत दिवसभरात ८१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर १,०२५ रुग्ण बरे हाेऊन घरी गेले. मुंबईतील एकूण काेराेनााबाधितांचा आकडा २ लाख ८४ हजार ५०२ आहे, तर २ लाख ५९ हजार १३७ रुग्ण काेराेनामुक्त झाले. एकूण १२ हजार ९२६ सक्रिय रुग्ण असून मृतांचा आकडा १० हजार ८७१ झाला आहे.
मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१ टक्के आहे. १९ लाख ५५ हजार ३४२ चाचण्या झाल्या आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर २४३ दिवस झाला आहे.