भिवंडी : अनैतिक संबंधात अडचण ठरलेल्या 14 महिन्याच्या मुलीस आईच्या संगनमताने प्रियकराने चपलेने ठार मारल्याची घटना शहरातील नवीवस्ती येथे दोन दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी मयत मुलीच्या आजीने सून व तिच्या प्रियकराविरोधात शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
झोयाबानू अब्दुल कयुम अन्सारी(14 महिने)असे मृत मुलीचे नाव आहे. तिची आई जनतुल फिरदोस अब्दुल कयुम अन्सारी(23)व तिचा प्रियकर राशीद मोहम्मद अन्सारी(3क्) यांच्या अनैतिक संबंधांच्या आड आल्याचा राग आल्याने राशीद याने मंगळवारी सकाळी 1क् ते 11च्या दरम्यान झोयाबानूच्या पाठीवर चपलेने फटके मारून तिला ठार केले.(प्रतिनिधी)