Join us  

मुंबईचा विकास आराखडा तयार करण्यासाठी १३.५९ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 3:35 AM

मुंबईचा विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च झाले आहेत.

मुंबई : मुंबईचा विकास आराखडा (२०३४) तयार करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आजमितीपर्यंत १३.५९ कोटी रुपये खर्च केले आहेत. विशेष कार्य अधिकारी असलेल्या रमानाथ झा यांच्या वेतनावर ४६.५५ लाख खर्च झाले आहेत. तर सूचना व हरकतींवर सुनावणीसाठी नेमलेल्या ३ माजी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधन आणि सुविधांवर २० लाख खर्च करण्यात आले आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबईचा डीपी (२०३४) तयार करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला आलेल्या एकूण खर्चाची माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचा प्रारूप विकास आराखडा (२०३४) पुनर्रचनेसाठी आजमितीपर्यंत १३ कोटी ५९ लाख आणि ५६ हजार खर्च करण्यात आले आहेत. फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित केलेल्या मुंबईच्या आराखड्यावर (२०३४) ५ कोटी ६० लाख ५ हजार खर्च केले. ज्यात २५ फेब्रुवारी २०१५ रोजी प्रकाशित आराखड्याच्या कामासाठी नेमलेले सल्लागार मेसर्स इजिस जियोप्लानला ३.४२ कोटी अदा केले. एमबी ग्राफिक्स आणि प्रिंटमोअर या कंपनीला ९६ लाख, मेसर्स एडीसीसीला १ कोटी १३ लाख, व्ही.के. पाठक सल्लागार आणि इन्फॉर्मल समितीच्या सदस्यांना ७ लाख ९० हजार आणि मेसर्स विदर्भ इन्फोटेकला २०१५ मध्ये स्वीकारलेल्या सूचना आणि हरकतीच्या अनुषंगाने डेटा एंट्री कामासाठी १६ लाख अदा केले.खर्चाचा तपशील असा...२७ मे २०१६ रोजी प्रकाशित सुधारित मुंबईच्या प्रारूप विकास आराखड्यावर ६ कोटी ८ लाख ६ हजार खर्च करण्यात आले.यात विशेष कार्यअधिकारी असलेले रमानाथ झा यांस जून २०१६ पासून सप्टेंबर २०१८ या कालावधीत वेतनरूपाने४० लाख अदा केले.प्राप्त सूचना आणि हरकतीवर आयोजित सुनावणीसाठी नेमलेल्या समितीच्या ३ सदस्यांवर १९ लाख ९९ हजार खर्च करण्यात आले.यात गौतम चटर्जी, सुरेश सुर्वे आणि सुधीर घाटे यांचा समावेश आहे. जाहिरातींवर १४.८३ लाख खर्च करण्यात आले.जेवणावर २ लाख ८३ हजार खर्च करण्यात आले. ३१ जुलै २०१७ रोजी महापालिकेच्या मंजुरीच्या अनुषंगाने महापालिका सदस्यांना भोजन व्यवस्थेवर १ लाख ६५ हजार खर्च करण्यात आले.महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर आराखडा प्रदर्शित करण्यासाठी परवाना खरेदी करण्यासाठी मेसर्स आर्क जीआयएस सर्व्हर एंडहान्स एंटरप्रायझेस या कंपनीला १ कोटी २६ लाख अदा करण्यात आले.सुधारित मुंबईच्या प्रारूप विकास आराखड्याचा नकाशा प्रिंटिंग करण्यासाठी ४६ लाख ९ हजार मेसर्स जयंत प्रिंटरी एलएलपी या कंपनीला अदा करण्यात आले.विकास आराखड्यावर २०१५ मध्ये एकूण १.९१ कोटी खर्च केले गेले. विशेष कार्य अधिकारी रमानाथ झा यांच्या मे २०१५ पासून मे २०१६ या कालावधीत वेतनावर १६.५५ लाख खर्च झाले आणि त्यांच्यासाठी खरेदी केलेल्या संगणकावर ४६ हजार खर्च केले.कन्सल्टेट फॉर डीसीआर टीमचे कांजलकर यांस ३ लाख ७० हजार आणि इन्फॉर्मल समितीच्या सदस्यांना २ लाख दिले.मेसर्स अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थातर्फे उपलब्ध विविध प्रकारच्या मनुष्यबळासाठी ३ कोटी ३५ लाख ५५ हजार अदा केले. बॅटरी बॅकअपसाठी मेसर्स एनएम सिस्टीमला २९ हजार अदा केले.

टॅग्स :मुंबई