लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : मुंबई येथे राहाणारा मनन केकीन गोगरी (१३) हा विद्यार्थी सजन येथील नेचल टॅल्सची अॅक्टीव्हीटी टिम चिचपाडा डॅम येथे पोहतांना बुडाला आहे. दुदैवाची बाब अशी की, त्याच्या कडे लाईफ जॅकेट होते मात्र पाण्यात उतरताना त्याने ते घातले नव्हते. ज्या मित्र मंडळाच्या मुलांबरोबर तो पाण्यात उतरल होता त्या पैकी कुणालाही पोहता येत नसल्याने ही दुर्घटना घडली. मनन हा तरुण मित्र मंडळ मुंबईच्या टिमसोबत दरवर्र्षीप्रमाणे उन्हाळ्यातील सुट्टीची मौज मजा करण्यासाठी शाळेतील इतर १२० मुलांबराबर सजन येथील नेचर टॅल्स येथे आला होता. दुसरे दिवशी यातील ६० मुलांना घेऊन टिम पोहण्याकरीता आले होते. दरम्यान, त्याचे प्रेत दुसरे दिवशी पाण्यावर आल्यावर हा प्रकार उघड झाला़ याबाबत नेचर टॅल्सची अॅक्टीव्हिटी टिम विरोधात मननच्या नातेवाईकांनी तक्रार केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
१३ वर्षांचा मुलगा डॅममध्ये बुडाला
By admin | Updated: May 6, 2017 05:22 IST