Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘मरे’वर आजपासून १३ नवीन फेऱ्या

By admin | Updated: March 19, 2016 02:15 IST

मध्य रेल्वेवर होणारी गर्दी लक्षात घेत शनिवारपासून मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १३ नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या फेऱ्या प्रामुख्याने कुर्ला ते कल्याणदरम्यान चालविण्यात

मुंबई : मध्य रेल्वेवर होणारी गर्दी लक्षात घेत शनिवारपासून मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर १३ नवीन फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. या फेऱ्या प्रामुख्याने कुर्ला ते कल्याणदरम्यान चालविण्यात येणार आहेत. यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यात असे आढळून आले की, डोंबिवलीला सर्वाधिक प्रवासी संख्या आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत कल्याण ते दिवा स्थानकांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ११ टक्क्यांनी वाढली आहे. त्या तुलनेत कुर्ला ते सीएसटीदरम्यानच्या प्रवासी संख्येत वाढ झालेली नाही. त्याचा तौलनिक अभ्यास केल्यानंतर प्रशासनाने कुर्ला ते कल्याणदरम्यान नव्या फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. (प्रतिनिधी)