Join us  

१३९ दगडफेकीच्या घटना, १६ ठिकाणी जाळपोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 4:00 AM

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला पुकारलेला राज्यव्यापी बंद हा गेल्या काही वर्षातील सर्वाधिक नुकसान घडविणारा दिवस ठरला. यादिवशी आंदोलकांकडून विविध १३९ ठिकाणी दगडफेक तर १६ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडून शेकडो कोटींच्या मालमत्तेची हानी झाली आहे.

मुंबई - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारीला पुकारलेला राज्यव्यापी बंद हा गेल्या काही वर्षातील सर्वाधिक नुकसान घडविणारा दिवस ठरला. यादिवशी आंदोलकांकडून विविध १३९ ठिकाणी दगडफेक तर १६ ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडून शेकडो कोटींच्या मालमत्तेची हानी झाली आहे.जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी १० ठिकाणी रबराच्या गोळ््या झाडल्या तर २० ठिकाणी अश्रूधुराच्या कांड्या फोडल्या. याप्रकरणी ११९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८३ जणांना अटक केली आहे. १४०० जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.बंदमध्ये सार्वजनिक मालमत्ता, बसेस व खासगी वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. बुधवारी रात्री उशीरापर्यंत घटनांचा पंचनामा व गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. आंदोलनाच्या काळात मुंबईसह पूर्ण राज्यभरात दीड लाखांवर पोलिसांची कुमक रस्त्यावर तैनात होती. बंदच्या काळात १७९ ठिकाणी रास्तारोको, २६ ठिकाणी रेलेरोको करण्यात आले.१६ ठिकाणी वाहने व टायर जाळण्यात आले. १३९ ठिकाणी दगडफेक करण्यात आली. १७० बसेसच्या तर १४८ खासगी वाहनांची तोडफोड झाली.

टॅग्स :भीमा-कोरेगाव