Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२५ जणांना अन्नातून विषबाधा

By admin | Updated: May 12, 2015 23:08 IST

तालुक्यातील आपटी येथील एका लग्न समारंभात हळदीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित भोजनातून १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी

वाडा : तालुक्यातील आपटी येथील एका लग्न समारंभात हळदीच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित भोजनातून १२५ जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. सर्वांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये नवरदेव केवल पाटील याचाही समावेश आहे. नेमकी कुठल्या पदार्थातून विषबाधा झाली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. आपटी येथील मधुकर पाटील यांच्या घरी लग्नसमारं होता. पाहुण्यांसाठी शाकाहारी व मांसाहारी जेवण होते. पाहुण्यांनी जेवण केल्यानंतर त्यातील १२५ जणांचे पोट दुखू लागले. चक्कर येणे, पोटात मळमळणे सुरु झाले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र गोऱ्हे, खानिवली आरोग्य केंद्र, वाडा ग्रामीण रूग्णालय, गुरूकृपा हॉस्पिटल, कल्याण हॉस्पिटल अशा विविध ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णांची सध्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. दिलीप इंगळे यांनी दिली. यामध्ये लहानमुले, महिला व पुरूषांचा समावेश आहे. डॉ. दिलीप इंगळे, डॉ. मुलतान शेख, डॉ. तेजश्री पाटील तसेच त्यांच्या पथक रुग्णांची काळजी घेत आहे.