Join us

१२ कोटींचे मोबाइल लंपास

By admin | Updated: December 31, 2014 22:58 IST

रेल्वेतून प्रवासादरम्यान मोबाइल चोरांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातही मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये या चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब समोर आली

अनिकेत घमंडी - डोंबिवलीरेल्वेतून प्रवासादरम्यान मोबाइल चोरांचे आव्हान उभे राहिले आहे. त्यातही मुंबईच्या उपनगरीय लोकलमध्ये या चोरीचे प्रमाण सर्वाधिक असल्याची बाब समोर आली असून गेल्या वर्षभरात तब्बल १२ कोटी ७० लाख ६० हजार ऐवढ्या प्रचंड किंमतीचे मोबाइल चोरट्यांनी लांबवले आहेत. या चोरीला आळा घालणे हे लोहमार्ग पोलीसांसमोर आव्हान ठरले असून मध्य-पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय व लांबपल्याच्या गाड्यांमध्ये मुंबई उपनगरासह लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या मोबाइल तक्रारीची ही आकडेवारी आहे.लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी या प्रकरणाची गांभिर्याने दखल घेतली असून त्यावर आळा घालण्यासाठी आता रेल्वे पोलीस विशेष पथक स्थापन करणार असून पोलीस या गुन्ह्यांची उकल सोपी करण्यासाठी सायबर लॅबोरेटरीही स्थापन करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. मोबाइल वापरणारे लोकल प्रवाशांना चोरटे 'टार्गेट' बनवत असल्याने तसेच मोबाइल चोरांचा माग काढण्याची डोकेदुखी वाढल्याने रेल्वे पोलीस यावर स्वतंत्रपणे सध्या विचार करत आहेत. सध्या रेल्वे पोलीस ठाण्यातच मोबाइल चोरीचे गुन्हे दाखल करून घेतले जात आहेत आणि तेथील पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र आता हे गुन्हे विशेष पथकाकडे देणार असल्याचेही ते म्हणाले. हे पथक प्रत्येक पोलीस ठाण्याशी समन्वय ठेऊन तपास करेल. यावर मोबाइल कंपन्यांचीही मदत घेतली जाणार असून चोर पकडले जाण्याची शक्यता वाढेल. ४या माहितीवरुन २०१४ मध्ये आलेल्या मोबाइल चोरी-मिसिंगच्या तक्रारींनुसार एकूण २५ हजार ४१२ प्रवाशांना हा फटका बसला आहे, त्यानूसार साधारणत: प्रत्येक मोबाइलची सरासरी किंमत सुमारे ५ हजार रुपये गृहीत धरल्यास तब्बल १२ कोटी ७० लाख ६० हजारांचे मोबाइल लंपास झाल्याची अंगावर काटा आणणारी आकडेवारी समोर येत आहे. ४ही आकडेवारी डॉ. सिंगल यांच्या वाडीबंदर मुख्यालयातून पोलिस निरीक्षक सुनिल भामरे यांनी दिली. त्यातच ही आकडेवारी केवळ आॅक्टोबर पर्यंतची असून नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची आकडेवारी अजून अपडेट झाली नसल्याने उपलब्ध होऊ शकलेली नाही. म्हणजेच या आकड्यांमध्ये अजूनही लाखोंची भर पडू शकते असे स्पष्ट होत आहे.वर्षचोरीचा गुन्हा मिसींगची तक्रार२०१४ (आॅक्टो)१हजार १९८२४हजार २१४२०१३१ हजार १२९२० हजार ९२५ २०१२८०५उपलब्ध झाली नाही