Join us
Daily Top 2Weekly Top 5

हिरे व्यापाऱ्याच्या घरातून १२ लाखांची रोकड चोरीला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:24 IST

नोकरांवर संशय, मलबारहील पोलिसांकड़ून तपास सुरुनोकरांवर संशय, मलबारहील पोलिसांकड़ून तपास सुरूलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या ...

नोकरांवर संशय, मलबारहील पोलिसांकड़ून तपास सुरु

नोकरांवर संशय, मलबारहील पोलिसांकड़ून तपास सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : हिरे व्यापाऱ्याच्या घरातून १२ लाख रुपयांच्या रोकड़सह सोन्याची अंगठी चोरीला गेल्याप्रकरणी मलबारहिल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घरातील दोन नोकरांनी संगनमत करून बनावट चावीच्या आधारे यावर हात साफ केल्याचा संशय आहे. त्यानुसार, मलबारहील पोलीस अधिक तपास करत आहेत.

मलबारहिल परिसरात तक्रारदार हिरे व्यापारी रोहन शाह (५०) कुटुंबीयासोबत राहण्यास आहेत. त्यांचा बीकेसी परिसरात हिऱ्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या घरी प्रभू कुमार (२१) हा तीन वर्षांपासून तर बबलू बजरंगी यादव (१८) हा दोन वर्षांपासून घरकामाला आहे. दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. व्यापारातून मिळणारी रक्कम ते नेहमी घरी ठेवत. घराच्या कपाटाच्या दोन चाव्यांपैकी एक चावी पत्नीकडे असायची.

गेल्या वर्षभरापासून पत्नीकडे ठेवण्यास दिलेली रक्कम कमी असल्याचे दिसून आले. याबाबत पत्नीकडे विचारणा करताच, दिलेली रक्कम त्या नेहमी कपाटात ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा घराच्या कपाटाची कोणीतरी बनावट चावी करून पैसे चोरी करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी पत्नीला लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला.

५ डिसेंबर रोजी मुलीची २० हजार रुपये किमतीची अंगठी मिळत नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे एकूण १२ लाख रुपयांसह २० हजार रुपयांची अंगठी चोरी गेल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. नोकरांनी चोरी केल्याचा संशय पोलिसांकडे वर्तविला आहे. त्यानुसार, पोलीस अधिक तपास करत आहे.