Join us
Daily Top 2Weekly Top 5

१२ डब्यांसाठी...

By admin | Updated: February 20, 2016 03:01 IST

हार्बरच्या सीएसटी स्थानकातील बारा डबा प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करतानाच रुळांचे काम १९ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आले आहे. विशेष ब्लॉक घेऊन हे काम २१ फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे.

हार्बरच्या सीएसटी स्थानकातील बारा डबा प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करतानाच रुळांचे काम १९ फेब्रुवारीपासून हाती घेण्यात आले आहे. विशेष ब्लॉक घेऊन हे काम २१ फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे. या कामासाठी २0 आणि २१ फेब्रुवारी रोजी सीएसटी ते वडाळादरम्यान हार्बरची लोकल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वडाळाहून डाऊन दिशेला मात्र लोकल सेवा सुरूच ठेवण्यात येईल. या कामामुळे २0 आणि २१ फेब्रुवारी रोजी हार्बरच्या प्रवाशांना व्हाया ठाणे, कुर्ला, दादरहून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वडाळा रोड ते नवी मुंबई, वांद्रेदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. यात गर्दीच्या वेळेत १५ विषेश लोकल फेऱ्या तर गर्दी नसलेल्या वेळेत १२ लोकल फेऱ्या होतील, अशी माहिती देण्यात आली.