आव्हान : काँग्रेसपुढे सत्ता टिकवण्याचे, तर विरोधकांना सत्तांतराचे
नंदकिशोर पाटील - मुंबई
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 66 तर राष्ट्रवादीच्या 5क् आमदारांच्या विधानसभा मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांना सुमारे 84 लाखांचे मताधिक्य मिळाल्यामुळे सत्ताधारी पक्षातील 116 आमदारांना धोक्याचा इशारा मिळाला आहे.
लोकसभा निवडणुकीने राज्यात प्रचंड राजकीय उलथापालथ घडवून आणली. या निकालाचा अर्थ, अन्वयार्थ यथावकाश लावला जाईल. पण, अनेकांना आतापासूनच विधानसभेचे वेध लागले आहेत. 48 पैकी तब्बल 42 जागा जिंकल्याने महायुतीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत, तर दारुण पराभवाने खचलेल्या काँग्रेसपुढे ‘डॅमेज कंट्रोल’चे मोठे आव्हान आहे. निवडणूक निकालाचा लसावि मतांच्या टक्क्यांवरून काढला जात असला तरी केवळ टक्केवारीवर जय-पराजयाचे गणित मांडले जाऊ शकत नाही. निवडणुकीवर प्रभावी ठरणारे इतरही घटक त्यास कारणीभूत असतात. तसे नसते तर मग काँग्रेसला मागील निवडणुकीच्या तुलनेत केवळ दीड टक्के मते कमी मिळाल्याने त्यांचे 24 उमेदवार पराभूत झाले नसते. राष्ट्रवादीचेही असेच झाले. या पक्षाला 2क्क्9 च्या निवडणुकीत 19.28 टक्के मते मिळून 8 उमेदवार विजयी झाले होते, तर 2क्14 च्या निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत चार अंकांची घसरण झाल्याने 17 उमेदवार पराभूत झाले. याचाच अर्थ, एकनिष्ठ मतदारांचे झालेले मतपरिवर्तन आणि विरोधकांच्या मताधिक्क्याला सुरुंग लावणारा मनसे फॅक्टर नसल्याने काँग्रेस आघाडीची दाणादाण उडाली.
देशभर आलेल्या मोदी लाटेत अनेक दिग्गज पराभूत झाले असताना एका वेगळ्या निकालाने मात्र अनेकांना कोडय़ात टाकले आहे. रिसोड विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे अमित झणक 12 हजारांच्या मताधिक्क्याने विजयी झाले, तर याच मतदारसंघातून अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संजय धोत्रे यांना सुमारे 25 हजारांचे मताधिक्य मिळाले. रिसोडच्या मतदारांनी एकाच वेळी काँग्रेस (विधानसभा) आणि भाजपाच्या (लोकसभा) उमेदवारास मताधिक्य मिळवून दिल़े याचाच एक अर्थ असा लावला जात आहे की, स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील निवडणुकांमध्ये लोकांचा पसंतीक्रम वेगळा असू शकतो. तसे असेल तर सत्ताधारी पक्षापुढे एवढा एकच आशेचा किरण असू शकतो़
लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या मतांमध्ये 18 टक्के
नवीन मतांची भर पडल्याने त्यांना 41 जागांवर घवघवीत यश मिळाले. शिवाय, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या माध्यमातून आणखी एका जागेची भर पडली. महायुतीला तब्बल 51.2 टक्के मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या दोन आणि भाजपाच्या केवळ एका विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आघाडीला मताधिक्य मिळाले आहे.