पुणे : बालाजीनगरमधील नित्यानंद लॉजवर छापा टाकून सहकारनगर पोलिसांनी वेश्याव्यवसाय करणार्या ११ युवतींना ताब्यात घेतले. त्या मुंबईतील आहेत. आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या तरूणींना मुंबईतून पुण्यात वेश्याव्यवसायासाठी आणले जात होते. या प्रकारातील दोन एजंट आणि लॉजमालक पसार झाले असून या तरूणींना पोलिसांनी महिला सुरक्षा गृहात रवाना केले आहे. त्या २० ते २५ वयोगटातील आहेत. अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक कायद्याखाली (पिटा) या तरूणींवर कारवाई करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरिक्षक सूरज पाटील,पोलीस निरिक्षक (गुन्हे)शशिकांत शिंंदे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांच्या मदतीने सापळा रचून ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
वेश्याव्यवसाय प्रकरणी ११ युवती ताब्यात
By admin | Updated: May 28, 2014 01:59 IST