Join us  

सायन परिसरातून ११ लाख ८५ हजारांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 12:57 AM

निवडणूक आयोगाच्या मुंबई शहर कार्यालयातील फिरत्या पथकाने बुधवारी रात्री सायन परिसरात छापा टाकून एका मोटारीतून ११ लाख ८५ हजाराची रोकड जप्त केली.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या मुंबई शहर कार्यालयातील फिरत्या पथकाने बुधवारी रात्री सायन परिसरात छापा टाकून एका मोटारीतून ११ लाख ८५ हजाराची रोकड जप्त केली. रेनॉल्ट डस्टर मोटारीतून प्रवास करीत असलेल्या तिघांकडे ही नोटांची बंडले होती. याबाबत सायन पोलिसांकडे नोंद करण्यात आली असून आयकर विभागाला कळविण्यात आल आहे.दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह व अनुराग कुमार शाह अशी अटक आरोपींची नावे आहेत़. बुधवार रात्री कोळीवाडा परिसरात विधानसभा मतदारसंघातील संजय नारायन वारंग यांच्या तीन क्रमांकाच्या फिरत्या तपासणी पथकाने सायन हॉस्पिटल जवळील सिग्नलवर पाहणी करीत असताना लाल रंगाच्या रेनॉल्ट डस्टर (एम.एच.४७ ए.बी.६५५९) तपासणी केली. गाडीतील बॅगेत एकुण ११ लाख ८५ हजाराची रोकड होती. दोन हजार व पाचशे रुपये चलनाच्या नोटांची बंडले भरलेली होती, यापकरणी पोलिसांकडे तक्रार देऊन आयकर विभागाला कळविले असल्याचे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार यांनी सांगितले.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019