Join us

१०१ जोडप्यांचे शुभमंगल सावधान...

By admin | Updated: June 2, 2014 03:46 IST

मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा सामुदायिक विवाह सोहळा जुना राजवाडा, जव्हार येथे आयोजित करण्यात आला

जव्हार : चॅरिटेबल ट्रस्ट, विरार व जीवदानी माता ट्रस्ट विरार आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्या संयुक्त विद्यमाने जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातील १०१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा सामुदायिक विवाह सोहळा जुना राजवाडा, जव्हार येथे आयोजित करण्यात आला होता. १ जून रोजी विवाह पार पडला. या सोहळ्यासाठी १ हजारपेक्षा अधिक लोकांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. हा सोहळा पारंपारीक पद्धतीने संपन्न झाला. या विवाहीत जोडप्यांना मंगळसुत्र, जानव्हे, नवरदेव, नवरीचे कपडे,ड्रेस, कुमकुम, भांडी आणि आदिवासी विकास प्रकल्पकडून १० हजार रोख रू. अनुदान इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी या विवाह सोहळ्यासाठी हजारो नागरीकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी आ. हितेंद्र ठाकूर अध्यक्ष बहुजन विकास आघाडी, माजी खा. बळीराम जाधव, नगराध्यक्ष रियाज मनीयार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशिनाथ पाटील, बबला शेख शहर अध्यक्ष बहुजन विकास आघाडी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)