Join us  

मागाठाणे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिलांची उपस्थिती! 

By मनोहर कुंभेजकर | Published: February 14, 2023 8:30 PM

मागाठाणे येथे खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिलांनी उपस्थिती दर्शवली. 

मुंबई : मागाठाणे येथील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आयोजित खेळ पैठणीच्या कार्यक्रमाला १०००० महिला उपस्थित होत्या. यावेळी वृषाली श्रीकांत शिंदे यांची खास उपस्थिती होती. दहिसर पूर्व  मालावणी जत्रा मैदान,सुहासिनी पावसकर रोड,क्रिसेंट मैदानाच्या बाजूला सदर कार्यक्रम आयोजित केला होता.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मागाठाणेत खेळ पैठणीचा माता भगिनींच्या सन्मानाचा हा खास कार्यक्रम मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार व विभागप्रमुख प्रकाश सुर्वे व युवा सेना कार्यकारणी सदस्य राज प्रकाश सुर्वे आणि वैष्णवी प्रकाश पुजारी  यांनी आयोजित केला होता. 

विजेत्या महिलांना वृषाली शिंदे यांच्या हस्ते आकर्षक पैठणी देवून गौरव करण्यात आला.तसेच यावेळी विजेत्या माहिलांना पाहिले बक्षिस फ्रिज, दुसरे बक्षिस वॉशिंग मशिन,तिसरे बक्षिस एलईडी टिव्ही,,चौथे बक्षिस मायक्रोवेव्ह ओव्हन आणि पाचवे बक्षिस एलईडी गॅस शेगडी देवून गौरव करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला टिफीन डब्याचे वाटप करण्यात आले. तर यावेळी उपस्थित दहा हजार महिलांसाठी सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर या करमणुकीच्या कार्यक्रमाचे आयोजन केली होती. यावेळी वृषाली शिंदे यांनी येथील महिलांना प्रोत्साहन देवून त्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कार्याचा त्यांनी खास गौरव केला.

यावेळी आमदार प्रकाश सुर्वे म्हणाले की,बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार पुढे घेवून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या शिवसेनेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण पुढे नेत उत्तर मुंबईच्या महिलांसाठी सातत्याने अनेक विधायक कार्यक्रम राबवले जातात. येथील महिलांच्या हाताला काम देण्यासाठी येथे रोजगार आणि स्वयंरोजगार उवक्रम आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी ललिता प्रकाश सुर्वे,महिला विभाग संघटक मीना पानमंद, वैष्णवी पुजारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.      

 

टॅग्स :मुंबईमागाठाणेएकनाथ शिंदे