Join us

घरी बसूनच घेताहेत जिल्ह्यातील १०० शिक्षक वेतन

By admin | Updated: February 26, 2015 01:27 IST

जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेले सुमारे १०० शिक्षक सध्या घरी बसून आहेत. तरीदेखील, त्यांना दरमहा वेतन द्यावे लाग

ठाणे : जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शाळांमध्ये अतिरिक्त ठरलेले सुमारे १०० शिक्षक सध्या घरी बसून आहेत. तरीदेखील, त्यांना दरमहा वेतन द्यावे लागत असल्याची कबुली ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर गायकवाड यांनी फेबु्रवारीच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देऊन लोकप्रतिनिधींना गार केले.मीरा-भार्इंदर महापालिकेच्या शाळांमध्ये सुमारे ११ शिक्षकांची कमी आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे एका सदस्याने पोटतिडकीने सांगितले. याविषयी चर्चा सुरू असतानाच पाहिजे तेवढे शिक्षक जिल्हा परिषदेकडे उपलब्ध आहेत. यातील सुमारे १०० शिक्षक घरी बसून पगार घेत आहेत. ते अतिरिक्त ठरले असून त्यांच्यासाठी कोणत्याही शाळेत जागा रिक्त नाही. महापालिकेने मागणी करताच आम्ही तत्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)