Join us

संगीताच्या गोडीमुळे भक्तीला १०० टक्के

By admin | Updated: June 14, 2017 00:28 IST

अभ्यासासोबत संगीताची गोडी भक्ती देशपांडे या विद्यार्थिनीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. परीक्षेतील यशासोबत संगीतामुळे अतिरिक्त १७ गुणांच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : अभ्यासासोबत संगीताची गोडी भक्ती देशपांडे या विद्यार्थिनीसाठी महत्त्वपूर्ण ठरली. परीक्षेतील यशासोबत संगीतामुळे अतिरिक्त १७ गुणांच्या आधारे भक्तीने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. ९५ टक्के गुणांची अपेक्षा होती. मात्र संगीताच्या अतिरिक्त गुणांमुळे तिने १०० टक्के गुणांचा पल्ला गाठल्याचा आनंद भक्तीने आपल्या शिक्षक आणि कुटुंबासह व्यक्त केला. दरम्यान, भविष्यात इंजिनीअर होण्याची तिची इच्छा आहे. अंबरनाथच्या रोटरी स्कूलची विद्यार्थिनी असलेली भक्ती अभ्यासात पुढे होती. दहावीच्या परीक्षेसाठी तिने नियोजनबद्ध अभ्यास केला. शाळा आणि खासगी क्लासेसव्यतिरिक्त दिवसातून अवघे तीन तास ती अभ्यासासाठी देत होती. मात्र या तीन तासांत नेहमी सातत्य ठेवल्याने त्याचा फायदा तिला झाला. अभ्यासासोबत तिला संगीताची आणि हार्माेनियमची प्रचंड आवड आहे. संगीताची परीक्षाही ती उत्तीर्ण झाली आहे. परीक्षेत ९५ टक्के गुणांची अपेक्षा तिने आधीपासूनच बाळगली होती. मात्र संगीतामध्ये मिळवलेल्या प्रावीण्याच्या जोरावर तिने भरारी घेतली.