ठाणे : स्वाइन फ्लूचा प्रभावी मुकाबला करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेबरोबरच संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी एका बैठकीत दिले. ठाण्यात स्वाइन फ्लूचे दोन रु ग्ण आढळून आल्याच्या वृत्ताची गंभीर दखल घेऊन पालकमंत्री शिंदे यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली होती. त्या वेळी जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी आवश्यक प्रयोगशाळा नसून मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयाप्रमाणे संसर्गजन्य आजारांवरील उपचाराची सोय असलेले रु ग्णालयही नसल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यानुसार, त्यांनी सावंत यांच्यासोबत बुधवारी बैठक घेऊन या मुद्यांवर चर्चा केली़ (प्रतिनिधी)स्वाइन फ्लूचा सामना करण्यासाठी दोन जादा फिजिशियन व २ जादा बालरोगतज्ज्ञ उपलब्ध करून देण्याचे आदेशही त्यांनी दिले. मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयाच्या धर्तीवर संसर्गजन्य आजारांवरील उपचारासाठी १०० खाटांचे रु ग्णालय उभारण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली असून हे रु ग्णालय महापालिका व शासनाच्या सहकार्यातून उभे करता येईल, असेही मत डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले. याबाबतचा प्रस्तावही तातडीने सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
स्वाइन फ्लूसाठी १०० खाटांचे रुग्णालय
By admin | Updated: February 15, 2015 00:19 IST