Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओल्या कचऱ्यातून दररोज १० मेट्रिक टन खतनिर्मिती

By admin | Updated: June 6, 2015 02:03 IST

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व सुका कचरा वर्गीकरण केंद्राची सुरुवात धारावी उदंचन केंद्रातून आज झाली़

मुंबई : ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व सुका कचरा वर्गीकरण केंद्राची सुरुवात धारावी उदंचन केंद्रातून आज झाली़ ओल्या कचऱ्यापासून दररोज १० मेट्रिक टन सेंद्रिय खतनिर्मिती तसेच ५ मेट्रिक टन सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची या केंद्राची क्षमता आहे़ या केंद्रात बसविण्यात आलेल्या यंत्रांचे डिझाईन पालिकेच्या अभियंत्यांनी तयार केलेले आहे़ओला व सुका कचरा वर्गीकरण सक्तीचे करण्यात आले़ गेल्या काही वर्षांमध्ये या मोहिमेला यश येत नसल्याने पालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी स्वतंत्र डबे वॉर्डांमध्ये बसविले़ परंतु हा कचरा एकत्रच डम्पिंग ग्राउंडवर जात असल्याने या मोहिमेला पालिकेकडूनच हरताळ फासला जात होता़ यावर सर्वत्र टीकेची झोड उठताच अखेर पालिकेने ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती व सुका कचरा वेगळा करण्यासाठी केंद्र स्थापन करण्याची तयारी सुरू केली़या नव्या केंद्राद्वारे ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती तसेच सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे शक्य होणार आहे़