Join us
Daily Top 2Weekly Top 5

गुरुनानक महाविद्यालयात १० लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 02:29 IST

सायन कोळीवाडा येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून बुधवारी रात्री घरफोडी झाल्याने खळबळ उडाली. यात मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातून दहा लाखांची रोकड चोरी झाली आहे.

मुंबई : सायन कोळीवाडा येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या दरवाजाचे कुलूप फोडून बुधवारी रात्री घरफोडी झाल्याने खळबळ उडाली. यात मुख्याध्यापक कार्यालयातील कपाटातून दहा लाखांची रोकड चोरी झाली आहे.गुरुवारी ही बाब उघडकीस येताच अ‍ॅन्टॉप हिल पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी रात्री कॉलेज बंद केल्यानंतर घरफोड्यांनी महाविद्यालयात प्रवेश केला. महाविद्यालयातील मुख्याध्यापक नाईक यांच्या कार्यालयातील दरवाजाचे ताळे तोडून कपाटातील महाविद्यालयाची रक्कम चोरून पळ काढला.सकाळी महाविद्यालयात आलेल्या शिक्षकांना कुलूप तुटलेले दिसले. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती अ‍ॅन्टॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुदर्शन पैठणकर यांनी दिली.

टॅग्स :दरोडा