Join us

मुरुड सुपेगाव घाटात अपघातात १० जखमी

By admin | Updated: April 9, 2015 23:18 IST

मुरुड सुपेगाव घाटात विक्रम रिक्षा अपघातात १० जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाचा मुलगा सुखरुप बचावला असून विक्रम रिक्षा

आगरदांडा : मुरुड सुपेगाव घाटात विक्रम रिक्षा अपघातात १० जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक वर्षाचा मुलगा सुखरुप बचावला असून विक्रम रिक्षा चालक हा सुध्दा गंभीर जखमी झाला आहे.मुरुड एकदरा येथील बलकावडे कुटुंबीयांच्या घरातील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी न्हावे या गावी नातेवाइकांसह विक्रम रिक्षाचालक सलिम दौनाक गुरुवारी सकाळी निघाले होते. यावेळी सुपेगाव घाटात वळणावर विक्रम रिक्षा पलटी झाल्याने चालकासह १० जण जखमी झाले. जखमींना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातात १ वर्षाचा चिमुरडा सुखरुप बचावला. तर चालक सलिम दौनाक, किसान बळी मुरुड, कृष्णा बळी मुरुड, अरुण केंडू मुरुड, नंदकुमार केंडु मुरुड, चंद्रकांत पाटील एकदरा, दौप्रदी पाटील, राजश्री पाटील एकदरा, नरु गार्डी, हिरा बोर्जी जखमी झाले आहेत. (वार्ताहर)